पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो मार्गाबाबत मोठा अडथळा दूर, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.
पुणे :पुणे मेट्रोचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. आता हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो लाईन तीनच्या शिवाजीनगर मेट्रो स्थानकासाठी आवश्यक असलेली जागा हस्तांतराला जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी लेखी परवानगी दिली. त्यामुळे या मेट्रो मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.
यामुळे आता या कामाला अजूनच गती मिळणार आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गासाठीची ९९.७५ टक्के जागा ताब्यात मिळाली आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ चे काम सुरू आहे. हा प्रकल्प खासगी विकासकाच्या माध्यमातून सार्वजनिक खासगी भागिदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात येत आहे. पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेडला हे काम ४० महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
यामुळे या मार्गाचे बरेचसे काम देखील झाले आहे. या मेट्रो मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी १०० टक्के भूसंपादन करून देण्याची जबाबदारी सरकार व पीएमआरडीएची आहे.
त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायालयाने ही जागा हस्तांतरणाला बुधवारी लेखी परवानगी दिली आहे. त्यामुळे मेट्रो मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे. मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेली ९९.७५ टक्के जागा मिळाली आहे.