पुण्यातील एमबीबीएस डॉक्टराचा कारनामा ; एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांनी ठोकल्या बेड्या


पुणे : पुण्यातील बिबेवाडी पोलिसांच्या हद्दीत ड्रग्ज तस्करी प्रकरणात एका उच्चशिक्षित डॉक्टरचा सहभाग आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एमबीबीएस डॉक्टरला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेन बेड्या ठोकल्या आहेत. उच्चशिक्षित डॉक्टरकडून अशाप्रकारे ड्रग्जची तस्करी होत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहम्मद उर्फ आयान जारून शेख असं अटक केलेल्या २७ वर्षीय एमबीबीएस डॉक्टरचं नाव आहे. तो पुण्यातील उंड्री परिसरात राहतो. संबंधित डॉक्टर आपल्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने ड्रग्जची तस्करी करत होता. पोलिसांनी मोहम्मद याच्यासह सॅम्युअल बाळासाहेब प्रताप (वय २८, रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) आणि अनिकेत विठ्ठल कुडले (वय २७, रा. नारायण पेठ) अशा इतर दोन आरोपींना देखील अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून एकूण ११ लाख ४३ हजार रुपयांचे मेफेड्रोन अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे आरोपी मोहम्मद उर्फ आयान जारून शेख याला पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात प्रॅक्टीस करत असताना ड्रग्ज प्रकरणातच पकडलं होतं. त्यावेळी त्याचं निलंबन देखील करण्यात आले होते. ही कारवाई होऊन देखील आरोपी मोहम्मद शेखच्या कृतीत काहीच फरक पडला नाही. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पुन्हा एकदा ड्रग्ज तस्करी प्रकरणात त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!