Pune : पतीचे बाहेरील महिलांसोबत अनैतिक संबंध, त्रासाला कंटाळून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय…


Pune  पुणे : पतीचे बाहेरील महिलांसोबत असलेले अनैतिक संबंध आणि त्याच्याकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

ही घटना येरवडा येथील नागपुर चाळीत मंगळवारी (ता. ७) सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

मोनिका मधुकर ओव्हाळ (३८) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

याबाबत प्रशांत सुरेश चाबुकस्वार (वय. ३१, रा. नागपुर चाळ, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून मधुकर लक्ष्मण ओव्हाळ (वय. ४५, रा. नागपुर चाळ) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. Pune

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मधुकर याचे इतर महिलांसोबत अनैतिक संबंध होते. आरोपी फिर्यादी यांच्या बहिणीला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देत होता. पतीच्या त्रासाला वैतागून फिर्यादी यांच्या बहिणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आहिरे करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!