Pune Market Yard : मराठा आरक्षणासाठी पुणे बाजार समितीचे गुलटेकडी मार्केटयार्ड उद्या राहणार बंद! व्यापारी साखळी उपोषणास बसणार – अनिरुद्ध भोसले


Pune Market Yard  : मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी व्यापारी सरसावले आहेत. येत्या बुधवारी (ता. १) मार्केटयार्ड बंद पुकारून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Pune Market Yard

त्यामुळे पुणे बाजार समितीचा गुलटेकडी मार्केटयार्ड फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागातील सर्व व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती पुणे बाजार समितीचे संचालक व श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाप्पू भोसले आणि सचिव करण जाधव यांनी दिली आहे.

तसेच मनोज जरांगे-पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी फळे व भाजीपाला विभागातील व्यापाऱ्यांसह विविध घटक गेट क्रमांक १ येथील आण्णासाहेब पुतळ्यासमोर बुधवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत साखळी उपोषण करणार आहेत.

दरम्यान, फूलबाजारातील दोन्ही संघटनांनीदेखील आंदोलनास पाठिंबा दिला आहे. फूलबाजारातील दोन्ही संघटना बंदमध्ये सहभागी होणार असल्याने बुधवारी फूलबाजार बंद राहणार असल्याची माहिती अखिल पुणे फूलबाजाराचे अध्यक्ष अरुण वीर, फूलबाजार आडते व व्यापारी संघाचे अध्यक्ष आप्पा गायकवाड यांनी दिली.

मराठा आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी बुधवारी (दि. १) लाक्षणिक बंदचे आवाहन केले आहे. फळे, तरकारी, कांदा-बटाटा विभागातील सर्व आडत्यांसह बाजार घटकांनी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणू नये.

– अनिरुद्ध ऊर्फ बाप्पू भोसले, अध्यक्ष, आडते असोसिएशन आणि संचालक, बाजार समिती, पुणे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!