पुणे लोकसभा पोटनिवडणुक लागणार की नाही? अजित पवारांनी सांगितली आतल्या गोटातील माहिती


पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यामध्येच आता विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी एक मोठा खुलासा केला आहे. अजित पवार म्हणाले, मला अशी माहिती समजली की, मला असं वाटत होतं की लोकसभेच्या निवडणूकीसाठी एकच वर्ष राहीलंय. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही.

पण बहुतेक गिरीश बापट यांचं दुखःद निधन झाल्यानंतर ती पण पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशी माझी आतल्या गोटातील माहिती असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.

यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता या जागेवर राष्ट्रवादी देखील दावा करण्याच्या तयारी आहे. यामुळे काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!