पुण्यातील जुन्नरमध्ये मोठा अपघात; इनोव्हा-पिकअपच्या धडकेत ५ ठार, गाडीची एअर बॅग तुटली…!


जुन्नर : जुन्नरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जुन्नरमधील माळशेज घाटाजवळ भीषण अपघात झाला आहे. नगर-कल्याण महामार्गावर हा अपघात झाला असून यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

इनोव्हा आणि पिकअप या गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास सदर अपघात घडला. ही धडक एवढी भयंकर होती की, इनोव्हा गाडीत असणाऱ्या सहापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

या अपघातात पिकअप चालक थोडक्यात बचावला आहे. वाहनांचा वेग इतका प्रचंड होता की इनोव्हाची एअर बॅग तुटून बाजूला पडल्याचीही माहिती आहे. यामुळे अपघाताची तीव्रता लक्षात येते.

 

दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

इनोव्हा गाडीच्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. बचावकार्यास सुरुवात करण्यात आली आहे. मृतांची नावे अद्याप समोर आली नाहीत.

 

दरम्यान, इनोव्हा गाडी ही कल्याणकडून आळेफाट्याकडे चालली होती. तर पिकअप वाहन हे कल्याणच्या दिशेने चालले होते. काही दिवसांपूर्वीच याठिकाणी असाच अपघात झाला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!