Pune : आता देशातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप, १ जानेवारीपासून संप होणार सुरू…
Pune पुणे : देशभरातील स्वस्त धान्य दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदमध्ये पुणे शहरातील दुकानदारही सहभागी हाेणार असल्याची माहिती आहे.
हा बंद १ जानेवारी पासून सुरु हाेणार आहे. अखिल महाराष्ट्र रास्तभाव दुकानदार व केराेसीन महासंघाचे पुणे शहराचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी यासंदर्भात माहीती दिली आहे.
तसेच कमिशनमध्ये वाढ करावी, नेटवर्क सर्व्हरची क्षमता वाढवावी, ज्येष्ठ नागरीकांना प्रत्यक्ष वाटप करण्याची सुविधा निर्माण करावी, अन्न धान्याचे वजन हे ज्युटच्या गाेणीसह करावे, दुकानांत डाळी, तेल, साखर आदींची अनुदानीत रक्कमेत विक्री करावी, विविध प्रकारच्या अनावश्यक नाेंदणी पुस्तकांची संख्या कमी करावी, काेराेना काळात मृत्युमुखी पडलेल्या दुकानदारांंना नुकसान भरपाई मिळावी, अनुकंपा तत्वानुसार परवाना द्यावा अशा विविध मागण्या राष्ट्रीय स्तरावर केल्या जात आहे. Pune
या मागण्यासंदर्भात ऑल इंडीया फेअर प्राईस शाॅप डिलर्स फेडरेशनतर्फे केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. १ जानेवारीपासून फेडरेशननेे बेमुदत बंद पुकारला आहे.
दरम्यान, १६ जानेवारीला दिल्ली येथील रामलिला मैदानावर आंदाेलन केले जाणार आहे. फेडरेशनचे महासचिव विश्वंभर बासू यांनी केलेल्या आवाहनानुसार पुण्यातील सर्व रेशनिंग दुकानदार या बंद मध्ये सहभागी हाेणार आहेत, असे डांगी यांनी सांगितले आहे.