Pune Crime : मुलगी लिफ्टमध्ये आली अन् विकृताने दाखवला ‘तो’ व्हिडिओ, कोथरूडमध्ये धक्कादायक प्रकार…

Pune Crime : पुणे शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

लिफ्टमध्ये क्लासला जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला आहे. Pune Crime
ही घटना कोथरूड येथील एका कोचिंग क्लासच्या बिल्डिंगमध्ये शुक्रवारी (ता. ३) सायंकाळी घडली. याप्रकरणी १६ वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पीडित मुलगी कोथरूड येथील एका कोचिंग क्लासमध्ये ट्यूशनसाठी जाते. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे क्लासला गेली होती. बिल्डिंगच्या पार्किंगमधून ती लिफ्टने क्लासमध्ये जात होती. त्यावेळी लिफ्टमध्ये एक अनोळखी व्यक्ती होता.
लिफ्ट वर जात असताना आरोपीने संबंधित मुलीला मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.