Pune Crime : महिलेचा मोबाईल हॅक, नंतर फोटोचे अश्लील व्हिडिओ व्हायरल, येरवडा परिसरातील धक्कादायक प्रकार..

Pune Crime : महिलेचे फोटो एडिटींग करुन अश्लिल व्हिडिओ तयार करुन व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली आहे. विनयभंग केल्या प्रकरणी येरवडा पोलिसांनी दोन मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकणी संगमवाडी, येरवडा येथे राहणाऱ्या २२ वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन 90281XXXXX व 93258XXXXX मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर ओटीपी पाठवून मोबाईल हॅक केला. त्यानंतर मोबाईलमधील फोटो गॅलरीत असलेल्या फोटोंचा वापर करुन अश्लिल फोटोवर महिलेचा चेहरा लावला. आरोपींनी महिलेचे फोटो एडिटींग करुन अश्लिल व्हिडिओ तयार केला. Pune Crime
दरम्यान, तयार केलेला महिलेचा अश्लिल व्हिडिओ तिच्या पतीच्या व्हॉट्सॲप वर पाठवला. तसेच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन महिलेच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे आशालता खापरे करीत आहेत.