Pune Crime : वडिलांनी काम करण्यास सांगितल्याने मुलाने केले धक्कादायक कृत्य, पुण्यात खळबळ…


Pune Crime पुणे : काम करण्यास सांगितल्याने मुलाने वडिलांवर कात्रीने वार करुन त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना विश्रांतवाडी भागात घडली. मुलाने केलेल्या हल्ल्यात त्याची आई जखमी झाली आहे. (Pune Crime)

लक्ष्मण मंजुळे (वय ५५, रा. टिंगरेनगर) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी मुलगा शिवनाथ लक्ष्मण मंजुळे (वय. २०) याला अटक केली आहे.

याप्रकरणी शिवनाथचा मामा बाबू दांडेकर (वय. ३६, रा. टिंगरेनगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना टिंगरेनगरमध्ये सोमवारी पहाटे दीड वाजता घडली.

मिळलेल्या माहिती नुसार, आरोपी शिवनाथ काही काम करत नव्हता. त्यामुळे वडील लक्ष्मण यांनी त्याला काम करण्यास सांगितले होते. काम कर, चांगले रहा, असे त्यांनी त्याला सांगितले होते. असे बोलत असत. त्यावरुन त्यांच्यात वारंवार वाद होत असत.

दरम्यान, मध्यरात्री लक्ष्मण गाढ झोपेत होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास शिवनाथने झोपेत असलेल्या वडिलांवर घरातील कात्रीने छाती आणि पोटावर वार केले. त्यांच्या ओरडण्याने त्याच्या आईला जाग आली.

तिने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला, त्यात कात्री हाताला लागून त्याही जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी शिवनाथ याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!