Pune Crime : प्रशिक्षणार्थी अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार, फुटबॉल प्रशिक्षकाचे धक्कादायक कृत्य, आरोपी अटकेत…


Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अल्पवयीन फुटबॉलपटू वर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी प्रशिक्षकावर रविवारी (ता.९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार कोंढवा येथे ७ जून पूर्वी उंड्री येथील आंबेडकर चौक शेजारी घडला आहे. याप्रकरणी फुटबॉलचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत पिडीत १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून यश हेमंत जैन(वय. २५ रा. जगदंबा रोड, मार्वल आयडीएल स्पेशिओ, आंबेडकर चौक शेजारी, उंड्री) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

सविस्तर माहिती अशी की,  आरोपी यश जैन फुटबॉलचे प्रशिक्षण देतो. फिर्यादी यांची 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी आरोपी यश याच्याकडे फुटबॉल प्रशिक्षण घेते.  यश याने कोचिंग देण्याच्या बहाण्याने मुलीसोबत जवळीक वाढवली. तिला घरी बोलवून घेत अश्लील व्हिडीओ दाखवले. तसेच तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. Pune Crime

दरम्यान, याबाबत पिडीत मुलीने आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पिडीतेच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपी यश याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!