Pune Crime : भीक मागण्यासाठी आपल्याच मुलीची विक्री, पुण्यात धक्कादायक घटना उघडकीस..


Pune Crime  पुणे : भीक मागण्यासाठी आपल्याच चार वर्षाच्या मुलीला तिच्या आईवडिलांनी २ हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासाठी समाजातील १० पंचांची त्यांनी सहमती घेतली असून, पंचांच्या सहमतीनंतर हा प्रकार घडला आहे. (Pune Crime)

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिचा ताबा असलेल्या दोघा पती पत्नीला अटक केली आहे. तर आई-वडिलांसह १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी अ‍ॅड. शुभम शंकर लोखंडे (वय २६, रा. वैदुवाडी, हडपसर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी हे वकिल असून त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्याची माहिती दिली. एक महिला गेल्या २ महिन्यांपासून कल्याणीनगर (Kalyaninagar ), विमाननगर (Viman Nagar) या भागात ४ ते ५ वर्षाच्या मुलीला घेऊन भीक मागत असताना दिसून येते. भीक मिळाली नाही तर तिला मारहाण करते. त्यांनी अधिक माहिती घेतली असता अहमदनगरमधील( Ahmednagar) एका दाम्पत्याला ६ मुली आहेत.

त्यांच्याकडून या तिघांनी समाजातील पंचाच्या सहमतीने २ हजार रुपयांना विकत घेतली. त्यासाठी जात पंचायतीने पैसे घेतल्याची माहिती मिळाली. समाजातील चौघा जणांनी त्या मुलीला विकत घेऊ नये, यासाठी विरोध केला.

दरम्यान, समाजातील १० पंचांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. त्याला मान्यता दिली. विरोध करणार्‍र्याना जातीचे बाहेर काढून असा जात पंचायतीने निर्णय दिला. त्यानंतर फिर्यादी यांना ही बाब समजल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन माहिती दिली. पोलिसांनी ही मुलगी ताब्यात असलेल्या दोघांना अटक केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!