Pune Crime : अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला अन् व्हायरल करण्याची धमकी देऊन मित्राच्या पत्नीवर केला बलात्कार, घटनेने उडाली खळबळ…
Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन पतीच्या दोन मित्रांनी एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime
याप्रकणी सातारा येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय पीडित महिलेने सोमवारी (ता.८) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळासाहेब आप्पासाहेब पवार (वय.४० रा. कराड, सातारा), सुशांत पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांच्या पतीच्या ओळखीचा आरोपी बाळासाहेब पवार याने फिर्यादी यांना पंढरपूर येथे सोडतो असे सांगून कारमधून पुण्यात आणले. पवार याने फिर्य़ादी अंघोळ करत असतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला.
यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी पवार याने जबरदस्तीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. बाळासाहेब पवार याने त्याचा मित्र सुशांत पवार याला बोलावून घेतले.
दरम्यान, त्याने देखील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.