Pune Crime News : पुण्यात मध्यरात्री खुनाचा थरार! थेट घरात घुसले अन् तीन गोळ्या झाडल्या, परिसरात खळबळ..
Pune Crime News : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे. Pune Crime News
पुण्यात काल रविवारी (ता.२९) मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबाराच्या घटनात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शहरातील खडक परिसरातील सिंहगड गॅरेज चौकात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अमित साहू असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , अमित साहू हा पुण्यातील खडक परिसरात राहतो. रविवारी (ता.२९ )मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून त्याच्यावर गोळीबार केला. यामध्ये साहू याचा मृत्यू झाला.स्थानिकांनी संबधित घटनेची माहिती पोलिसांना कळवली.
दरम्यान, या घटनेचे माहिती मिळताच खडक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.