Pune Crime News : हवेली तालुक्यात धक्कादायक घटना! सिमेंटचा पोल डोक्यात मारून तरुणाला संपवलं…

Pune Crime News पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा पोल मारून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. Pune Crime News

ही घटना सोमवारी (ता.१६) रात्री साडे आठच्या सुमारास हवेली तालुक्यातील बकोरी गावातील वारघडे वस्ती येथे घडली. या घटनेत दोनजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. Pune Crime News
सुहास हरिदास शिंदे (रा. वरघडे वस्ती, बकोरी गाव, ता. हवेली) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर संदिप हरिदास शिंदे आणि हरिदास केरबा शिंदे असे जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.

याप्रकरणी संदिप शिंदे याने लोणिकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी किसन पवार, बालाजी पवार, दिगंबर पवार (सर्व रा. बकोरी गाव, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी किसन पवार फिर्यादीच्या पत्नीला मोबाईवर मेसेज करुन त्रास देत असल्याने वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी जखमी व आरोपी सोमवारी रात्री फिर्य़ादी यांच्या घरासमोर बसले होते. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाले.
आरोपींनी फिर्य़ादी, त्यांचा मयत भाऊ व वडिल यांना धक्काबुक्की करुन मारहाण केली. त्यावेळी किसन पवार याने घरासमोर पडलेला सिमेंटचा पोल सुहासच्या डोक्यात मारला.
तर बालाजी पवार याने फिर्यादी यांच्या वडिलांच्या डोक्यात दगड व विटा मारुन मारहाण केली तर दिगंबर पवार याने फिर्यादी यांना लोखंडी हत्याराने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. जखमी झालेल्या सर्वांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिघांवर उपचार सुरु असताना सुहास शिंदे याचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.