Pune Crime News : रागाच्या भरात मुलाने आई आणि बहिणीच्या पोटात खुपसला चाकू, हडपसर येथील घडली घटना, धक्कादायक कारण आलं समोर


Pune Crime News पुणे : आईने मुलाला त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स बाबत विचारणा करताच त्याने आई आणि बहिणीच्या पोटात चाकू खूपसत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (Pune Crime News)

ही घटना हडपसर परिसरातील काळेपडळ येथील बिनावत टाऊनशिप सोसायटीत शनिवार (ता.२३) रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

साजिद युसुफ पठाण (वय. २९) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी रुबीना युसुफ पठाण (३०, रा. बिनावत टाऊनशिप सोसायटी, काळेपडळ रोड, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, साजिद हा कोणताच कामधंदा करत नाही. त्यामुळे घरात नेहमी किरकोळ वाद होत होता. शनिवारी संध्याकाळी आरोपी साजिद याच्या आईने त्याला लायसन्सविषयी विचारणा केली.

याचा राग येऊन साजिदने ‘तेरे को तो मै आज मार दुँगा’ असे म्हणत आधी बहिण रुबीना यांच्या पोटावर चाकूने वार केले. त्यांचा आरडाओरडा ऐकून आरोपी साजिदची आईमध्ये पडली असता त्याने आईवर देखील चाकूने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, फिर्यादी रुबीना आणि त्यांच्या आईवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अब्दागिरे करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!