Pune Crime News : भयंकर! आपल्याच मित्राला संपवून व्हिडीओ स्टेटस ठेवला, क्रूर कृत्याने पुणे हादरले…


Pune Crime News : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

पुण्यातील चाकणमध्ये अल्पवयीन मुलांनी अल्पवयीन मित्राचीच हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे दगडाने ठेचत हत्या करतानाचा त्यांनी व्हिडीओ ही बनवला आणि तो इन्स्टाग्रामच्या स्टेटसवर ही ठेवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलांमधील ही क्रूरता पाहून पिंपरी चिंचवड पोलिसांना धक्का बसला आहे. चाकणमधील एका रिकाम्या प्लॉटमध्ये ही घटना सोमवारच्या रात्री घडली आहे. Pune Crime News

नेमकं घडले काय?

शाब्दिक चकमकीतून सुरू झालेला वादाचे पडसाद थेट हत्येत उमटले आहेत. मृत अल्पवयीन मुलावर चार महिन्यांपूर्वीच हत्येचा गुन्हा दाखल आहे. तर हत्या करणाऱ्यांपैकी एकावर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. चाकण पोलिसांनी मुख्य आरोपीसह अल्पवयीन मित्राला ताब्यात घेतलेले आहे.

मृत मुलगा, मुख्य आरोपी अन तिसरा साथीदार तिघे मद्यपान करत होते. त्यावेळी मृत मुलात आणि तिसऱ्या मित्रात शाब्दिक चकमक झाली. यातून मृत मुलाने त्याच्या कानशिलात लगावली. हे पाहून मुख्य आरोपी संतापला आणि त्याने मृतकाला दगडाने ठेवले.

व्हिडीओत नेमकं काय आहे?

या हत्येचा व्हिडीओ त्या दोघांनी बनवला, यात मुख्य आरोपी मृतकाच्या डोक्यात दगड घालताना दिसत असून, तो व्हिडीओ इन्स्टाग्रामच्या स्टेट्सवर ठेवण्यात आल्याचं ही समोर आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याआधारे चाकण पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!