Pune Crime News : गायक सिद्धू मुसेवाला कांडमधील शार्प शूटर संतोष जाधवच्या नावाने पुण्यातील व्यावसायिकाला खंडणीची धमकी..
Pune Crime News : गायक सिद्धु मुसेवाला हत्या प्रकरणातील शॉर्प शुटर संतोष जाधव याच्या नावाने एका व्यावसायिकाला फोन करुन त्यांच्याकडे खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे.
पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला यांची कॅनडातील गॅगस्टरने हत्या केली होती. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील शॉर्प शूटर संतोष जाधव व त्याच्या साथीदाराला सुपारी देण्यात आली होती. ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधव याला गुजरातमधून अटक केली होती. देशभर हे प्रकरण खूप गाजले होते. Pune Crime News
याप्रकणी कोथरुड येथील एका ३४ वर्षाच्या व्यावसायिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते गेले काही दिवस आजारी आहेत. कोथरुडमधील घरी ते असताना त्यांना शनिवारी सायंकाळी एक फोन आला.
फोन करणार्याने सिद्धु मुसेवाला कांड ऐकला आहे का, मी संतोष जाधव बोलत आहे. तुझ्या नावाची १५ लाखांची सुपारी मिळाली आहे. तुझा जीव हवा असेल तर तू किती देतोस बोल. पैसे नाही दिले तर गोळ्या घालीऩ, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली.
तुझ्या घरच्यांना बायका पोरांना मारेन, तुला दिवाळी साजरी करायची असेल तर आता ५० हजार दे असे म्हणून पुन्हा धमकावले. या फोननंतर या व्यावसायिकांनी घाबरुन तातडीने कोथरुड पोलीस ठाणे गाठले. कोथरुड पोलीस तपास करीत आहेत.