Pune Crime : सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून विनयभंग, पतीच्या मित्रावर गुन्हा दाखल लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा…

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मित्राच्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत त्यावर अश्लील कमेंट करुन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (ता.२९) सकाळच्या सुमारास घडला आहे.
याप्रकणी वाघोली येथे राहणाऱ्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी महिलेच्या पतीचा मित्र महादेव सुरवसे (रा. मुरुड, लातुर) याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या पतीचा मित्र असल्याने एकमेकांच्या परिचयाचे आहेत. आरोपीने काहीतरी वादातून फिर्यादी यांच्या पतीला शिवीगाळ केली. भांडणाचा राग मनात धरून आरोपीने त्याच्या मोबाईलवरून फेसबुकवर महिलेचा फोटो अपलोड केला. Pune Crime
तसेच तो फोटो व्हायरल करुन त्यावर अश्लील कमेंट केली. ही बाब फिर्यादी यांना समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे करत आहेत.