Pune Crime : स्वारगेटमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीने मुलीचा पाठलाग केला अन्…
Pune Crime : पुण्यातील स्वारगेट परिसरातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी मोबाईलवर गेम खेळत असताना नाराधमाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत असभ्य वर्तन करुन तिचा विनयभंग केला आहे.
घटनेनंतर स्वारगेट पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार स्वारगेट परिसरातील एका सोसायटीत घडला आहे. याबाबत 16 वर्षीय मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस याबाबत लगेच कारवाई केली.
नवीन गोपाल सूर्यवंशी (वय-35 रा. हुबळी, धारवाड, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. पीडीत मुलगी घरातील हॉलमध्ये डायनिंग टेबल समोरील खुर्चीवर बसून मोबाईलमध्ये गेम खेळत होती. त्यावेळी आरोपीने पाठीमागून येऊन मुलीसोबत असभ्य वर्तन केले. Pune Crime
यामुळे मुलगी घाबरली. नंतर मुलीने तेथून पळून जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करुन पकडले. तिच्यासोबत अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे मात्र पालकांना मोठा धक्का बसला आहे. तसेच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे याठिकाणी बोलले जात आहे.