Pune Crime : तिच्या मित्राला बांधून ठेवले अन् २१ वर्षीय तरुणीवर तिघांनी बलात्कार केला, पुण्यातील बोपदेव घाटातील भयंकर सत्य आलं समोर…


Pune Crime : सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत आहेत. काल (गुरूवारी) स्कुलबस चालकाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच आता शहरात आणखी एक अत्याचाराची घटना समोर आली.

पुण्यात मित्रासोबत फिरायला पुण्याजवळील बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीचे मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत आधी अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिघांनी त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलीसांनी या प्रकरणी राजेखां करीम पठाण याच्यांसह तिघांना अटक केली आहे.

ही घटना समोर आल्यानंतर आता संताप व्यक्त केला जात आहे, काल (गुरूवारी) पोलिस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर संतप्त जमाव एकत्रित आला होता, त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबाबत संतापजनक पोस्ट आपल्या सोशल मिडिया शेअर केली आहे, त्यानंतर आता या घटनेबाबत पोलिसांनी संपूर्ण माहिती दिली आहे. Pune Crime

पुण्याचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, काल (गुरूवारी) रात्री २१ वर्षीय मुलगी आपल्या मित्रासोबत पुण्याजवळील बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेली होती. रात्री ११च्या सुमारास ते तिथे गेले होते. 3 लोकांनी मुलांना मारहाण करत अतिप्रसंग केला आहे. Pune Crime

या घटनेची माहिती आपल्याला आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मिळाली. या प्रकरणात एकुण १० पथकं कामाला लावली आहेत. अनेक लोकांची चौकशी सुरु आहे. एकुण ३ मुलं आहेत त्यांचा शोध सुरु आहे. मुलगी बाहेर राज्यातील आहे. बोपदेव घाटात नेहमी लोक वॉकिंगला जातात.

यावेळी ही घटना समोर आली, मारहाण करत मित्राला त्याठिकाणी बाधून ठेवले होते. मुलगी गंभीर जखमी आहे, तिच्यावरती देखील उपचार सुरु आहेत. आरोपी पुर्णपणे निष्पन्न झालेले नाहीत. पिडीत मुलगी २१ वर्षाची आहे. दोघेही कॉलेजमध्ये शिक्षण घेतं आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!