Pune Crime : धक्कादायक! दारू प्यायला पैसे न दिल्याने लोखंडी रॉड डोक्यात मारून पत्नीचा खून, भोसरी परिसरातील घटनेने खळबळ..

Pune Crime : दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याचे कारणावरून लोखंडी रॉड डोक्यामध्ये मारून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना रविवारी (ता.१०) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सिल्व्हर करिष्मा बिल्डींग समोर, शिवाजी वाडी मोशी येथे घडली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पती फरार झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
जयश्री मारुती बाबान्ना (वय.४७ रा. सिल्व्हर करिष्मा बिल्डिंग समोर शिवाजीवाडी, मोशी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकणी जयश्री यांचा मुलगा बालाची मारुती बाबान्ना (वय.२९) याने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार, मारुती चंद्राप्पा बाबान्ना (वय.५० रा. सिल्व्हर करिष्मा बिल्डिंग समोर शिवाजी वाडी, मोशी) याच्यावर दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी बालाजी याला दारु पिण्याचे व्यसन आहे. यावरुन फिर्य़ादी यांची आई आणि वडिल यांच्या सतत वाद होत होते. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आरोपीने पत्नीकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. Pune Crime
दरम्यान, पत्नीने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड डोक्यात मारला. यामध्ये गंभीर जखमी होऊन जयश्री यांचा मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पठारे करीत आहेत.