Pune Crime : सासूच्या छळाला कंटाळून विवाहितेची विष पिऊन आत्महत्या, पुण्यात धक्कादायक घटना..
Pune Crime पुणे : सासुकडून दिल्या जाणार्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी सासुविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)
सायली सौरभ भागवत (वय. २२, रा. शुक्रवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी रवी अनिल आहिरे (वय ३९, रा. शुक्रवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद आहे. त्यानुसार पोलिसांनी राजश्री राजेंद्र भागवत (रा. दत्तवाडी) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांची भाची सायली भागवत हिची सासु तिचे चारित्र्यावरुन संशय घेत होती. तिला झोपडपट्टीत राहणारी चिंधीचोर आहे. तुला स्वयंपाक नीट बनवता येत नाही, असे म्हणून मानसिक व शारीरीक त्रास देऊन उपाशी ठेवत असत.
तिला पतीपासून अलिप्त राहण्यास भाग पाडले. तिला मध्यरात्री २ वाजता घराबाहेर हाकलून दिले होते. या त्रासाला कंटाळून तिने ११ सप्टेंबर रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचार सुरु असताना तिचा मृत्यु झाला. सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.