Pune Crime : पुण्यात खळबळ! ससून रुग्णालयाच्या गेटवर सापडले २ कोटींचे ड्रग्ज..


Pune Crime पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासुन गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. शहरात ड्रग्सच्या कारवायांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर २ कोटीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. Pune Crime

पुणे पोलिसांच्या Pune Crime गुन्हे शाखेच्या ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅम चे मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले आहेत. जप्त केलेल्या MD म्हणजेच मेफिड्रोनची किंमत तब्बल २ कोटी रुपये इतकी आहे. या माहितीला गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे.

हे एक हाय प्रोफाईल रॅकेट असून आरोपी ललित पटेल आणि आणखी २ तरुण यात सहभागी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ललित पटेल हा कुख्यात आरोपी असून ड्रग्सची तस्करी केल्याप्रकरणी त्याला या आधीच पोलिसांनी अटक केली होती आणि त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती.

दरम्यान, ललित पटेलला वैद्यकीय उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात भरती असताना सुद्धा त्याने हे रॅकेट चालवले कसे याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. ससून रुग्णालयातील  Pune Crime कोणी कर्मचारी या प्रकरणात आहे का या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे. ससून हॉस्पीटलच्या गेटवर मोठा अंमली पदार्थाचा साठा सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!