Pune Crime : वडिलांच्या परस्पर फ्लॅटची कागदपत्रे चोरुन मुलाने घेतले १ कोटी २० लाखांचे कर्ज, गुन्हा दाखल..


Pune Crime पुणे : वडिलांच्या मालकीची फ्लॅटची कागदपत्रे चोरुन मुलानेआईच्या खोट्या सह्या केल्या. त्याआधारे ॲक्सेस बँकेच्या अधिकार्यांशी संगनमत करुन तब्बल १ कोटी २० लाख रुपयाचे कर्ज घेतले. कर्ज घेतल्यानंतर मुलगा फरार झाला असून वडिलांनी आपल्याच मुलावर गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime

मुकेश जयंतीलाल शहा (वय. ६३, रा. सुयोग, दत्तवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपन मुकेश शहा (वय.३४), तत्कालीन अ‍ॅक्सिस बँकेचे अधिकारी व डी एस ए एजन्सीचे अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळलेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांचे किराणा भुसार दुकान आहे. त्यांचा मुलगा तपन हा त्यांच्याबरोबर काम करीत होता. त्याने घराची कागदपत्रे चोरली. कोणतीही परवानगी न घेता ती अ‍ॅक्सिस बँकेत कर्जासाठी दिली. फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या खोट्या सह्या केल्या.

अ‍ॅक्सिस बँकचे अधिकारी व डीएसए एजन्सीचे अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संगनमत करुन १ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज घेतल्यानंतर तपन शहा हा पळून गेला आहे.

दरम्यान, मुलगा पळून गेल्यानंतर फिर्यादी यांना या कर्जाबाबत समजले. त्यानंतर त्यांनी आता आपल्या मुलाविरोधात फसवणूकीची तक्रार दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!