Pune Crime : महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी अन् विनयभंग, कोरेगाव पार्क येथील धक्कादायक घटना, एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल.


Pune Crime पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेसोबत जवळीक साधून तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. Pune Crime

याप्रकरणी विश्रांतवाडी येथे राहणाऱ्या २५ वर्षाच्या महिलेने कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संतोष वामनराव भरेकर व त्याची पत्नी, मित्र राहुल शिवाजी जाधव व एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार कोरेगाव पार्क येथील एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये रविवारी (ता.८) दुपारी साडेचार ते पाच या दरम्यान घडला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी महिला या कौटुंबिक कारणामुळे पतीपासून विभक्त राहत आहेत. महिलेची आरोपी संतोष व त्याचा मित्र राहुल यांच्यासोबत ओळख होऊन मैत्री झाली होती.

दरम्यान, आरोपी संतोष याने महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्यासोबत लगड करण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलेसोबत अश्लील चाळे करुन शारीरिक संबंधाची मागणी केली. शारीरिक संबंध ठेवले नाही तर बदनामी करण्याची धमकी आरोपीने दिली.

पीडित महिलेने याबाबत आरोपी संतोष याच्या पत्नीला सांगितले. दरम्यान, फिर्यादी रविवारी दुपारी कोरेगाव पार्क येथील हॉटेलमध्ये मित्र मैत्रिणींसोबत पार्टी करण्यासाठी गेल्या होत्या.

त्यावेळी आरोपी संतोष याच्या पत्नीने हॉटेलमध्ये जाऊन फिर्यादी यांना जातिवाचक शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली . तसेच त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!