Pune Crime : येरवडा गोळीबारातील जखमी हॉटेलचालकाचा मृत्यू, पुण्यात गुन्हेगारीचा उद्रेक….

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. शहरातील मुळशी पॅटर्नची राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी येरवडा भागात झालेल्या गोळीबारात तरुण जखमी झाला होता. या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.
विकी राजू चंडालीया (वय. ३१) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मुळशी पॅटर्ननुसार गोळीबार केल्यानंतर तरुणावर वार केल्याची घटना पुण्यातील २ दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणाची राहुल चंडालीया याने पोलिसात तक्रार दिली.
तक्रारीनुसार येरवडा पोलिसांनी आकाश चंडालीया, अक्षय सतीश चंडालीया, अमन सतीश चंडालीया, अभिषेक शाम चंडालीया, संदेश संतोष चंडालीया, सुशांत प्रकाश कांबळे आणि संकेत तारू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. Pune Crime
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथील अग्रसेन शाळेसमोर विकी चंडालीया याचे व्हीआर ४ यु’ नावाचे हॉटेल आहे. खुनाच्या गुन्ह्यात सहा महिन्यांपूर्वी येरवडा कारागृहातून आकाश चंडालीया जामिनावर बाहेर आला होता.
शुक्रवारी पहाटे एकच्या सुमारास आकाश चंडालीया हा त्याच्या भाऊ व साथीदारांसोबत विकीच्या हॉटेलमध्ये शिरले. आकाशने विकीकडे पुन्हा पैसे मागितले. विकी ने पैसे देण्यास नकार दिला.
दरम्यान, त्यामुळे आकाशने त्याच्या जवळील पिस्तूल काढून हवेत एक व दुसरी गोळी विकीवर झाडली. विकीच्या पोटाच्या उजव्या बाजूला कमरेला गोळी लागली. त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्याचा मृत्यू झाला.