Pune Crime : मोबाईल काढून घेतल्याचा राग, १४ वर्षांच्या मुलाने आईवर केला हल्ला, घटनेने पुण्यात खळबळ..


Pune Crime : आपल्या हातातून मोबाईल काढून घेतला, त्यामध्ये सुरू असलेली मालिका बंद केल्याने अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात आईवर कात्रीने वार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर पुण्यातून आला आहे. त्यानंतर मुलाने घरातील खिडकीच्या काचा फोडून आईला मारहाण केली.

ही धक्कादायक घटना धनकवडी परिसरात घडली आहे. या घटनेनंतर आईने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला धनकवडी भागात राहते. त्यांचा मुलगा १४ वर्षांचा असून ते आत्ता सातवीत शिकत आहे. सोमवारी फिर्यादी महिला आणि त्यांचा मुलगा मोबाईलमध्ये युट्युबवर एक मराठी मालिका पाहत होते.Pune Crime

बराच वेळ दोघेही मालिक पाहात असल्याने फिर्यादी यांनी मुलाकडून मोबाईल हातातून घेऊन मालिका बंद केली. हातातून मोबाईल हिसकावून घेतल्याने मुलगा आईवर चिडला. त्याने आईला मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्याने रागातून घरातील लाकडी फ्रेम देखील फोडली, त्याचबरोबर त्याने कात्रीने आईवर वार करण्याचा प्रयत्न केला. आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घरातील खिडकीच्या काचा फोडल्या. त्यामुळे घाबरलेल्या आईने या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!