Pune Crime : बर्थडे सेलिब्रेशनसाठी न आल्याचा राग, रागातून दोघांवर कोयत्याने वार, पुण्यात भयंकर घटना…
Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गणपती विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर वाढदिवस साजरा करण्यासाठी न आल्यावरून मित्राशीच वाद घालत त्याच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार केल्याची घटना घडली आहे.
यात मित्र गंभीर जखमी झाला आहे. तर, या दोघांचे भांडणे सोडवण्यास आलेल्या दुसऱ्या एका तरुणाच्याही डोक्यात वार करुन महिलेला मारहाण केली. येरवडा परिसरात ही घटना घडली आहे. Pune Crime
याप्रकरणी आकाश आनंद कुसाळे (वय. २३, रा. पर्णकुटी चौक, येरवडा) यांनी येरवडा पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी सिध्दांत गुंजाळ (वय. २३), अशिष धोत्रे (वय. ३२), राहुल मालगांवकर (वय. २८), कपिल धोत्रे (वय. ३५), रोहन कुसळकर (वय. २२), रोहित शिंदे (वय. २३), मयुर गुंजाळ (वय. २६), सागर रमेश मोहिते (वय. ३२, सर्व रा.वडारवस्ती, येरवडा,पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, आशिष धोत्रे आरोपीने त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आकाश कुसाळे याला बोलवले होते. मात्र गणपती विसर्जन मिरवणूकीमुळे तो थकला होता. त्यामुळे तो वाढदिवसाला गेला नाही. त्याने पार्टीस जाण्यासाठी नकार दिला.
हा राग मनात ठेऊन आरोपींनी त्यांच्याकडील कोयत्याने आकाश याच्या डोक्यावर वार केला. तो रक्तबंबाळ होताच, वे वाद सोडविण्यासाठी त्याची काकू व त्यांचा मुलगा रोहन शेलार हे मध्ये आले. त्यावेळी आरोपी सिद्धांत गुंजाळ याने त्यांच्याकडील हत्याराने रोहन याच्या डोक्यात वार केला. नंतर सिद्धांत गुंजाळ याच्याबरोबरील मुलांनी सर्वांना मारहाण केली़. सहायक पोलीस निरीक्षक कदम अधिक तपास करीत आहेत.