Pune Crime : ‘ते’ फोटो अन् व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवुन तरूणीवर बलात्कार, मुकुंदनगरमधील धक्कादायक घटना…

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

तरूणी राहत्या घरी झोपलेली असताना तिचे न्युड फोटो आणि व्हिडीओ काढून ते तिच्या घरच्यांना तसेच बॉयफ्रेडला आणि सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देवुन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी तरूणाविरूध्द स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पिडीत तरूणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सौरभ सुभाषचंद्र गुप्ता (वय.३०, रा. सी.जी.एच.एस. शासकिय क्वॉटर्स, मुकुंदनगर, पुणे) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पिडीत तरूणी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने सप्टेंबर २०२३ ते डिसेंबर २०२३ दरम्यान पिडीत तरूणी घरी झोपलेली असताना तिचे न्युड फोटो आणि व्हिडीओ काढले. Pune Crime
दरम्यान, ते तिच्या घरच्यांना, बॉयफ्रेडला तसेच सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी तरूणीला देवून तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध ठेवले. आरोपीने फिर्यादीच्या व त्याच्या राहत्या फ्लॅटवर तरूणीस हाताने मारहाण केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.