Pune Crime : दारू पिऊन रिक्षा चालकांना त्रास, तरुणाचा काढला काटा, पुण्यात दिवसाढवळ्या घटना..


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.

तरुणाला रिक्षातून आणून मोशी कचरा डेपो समोरील ९० फुटी रस्त्यावर त्याचा खून केला. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा घडलेल्या या गुन्ह्याचा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने उलगडा केला. याप्रकरणी तीन जणांना अटक केली. रिक्षाचालकाला त्रास दिल्याने हा खून केल्याचे तपासातून निष्पन्न झाले.

अमोल पवार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रशांत सुधाकर कांबळे (वय. १९, रा. गुळवे वस्ती, भोसरी), शुभम अशोक बावीस्कर (वय२३, रा. धावडे वस्ती, भोसरी), विजय उमेश फडतरे (वय२२, रा. गायकवाड वस्ती, मोशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोशी कचरा डेपो समोर तीन जणांनी मिळून एका तरुणाचा खून केला. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेने केला. Pune Crime

दरोडा विरोधी पथकातील पोलिस अंमलदार सागर शेडगे आणि गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील संशयित हे रिक्षातून चाकणच्या दिशेने जात आहेत. त्यानुसार दरोडा विरोधी पथकातील पोलिसांनी चाकणच्या दिशेने जात असताना लांडगेनगर भोसरी येथून संशयित रिक्षा पकडली. रिक्षातून प्रशांत कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या दोन साथीदारांसह मिळून हा गुन्हा केल्याचे सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!