Pune Crime : मुलाने अंगठी चोरल्याच्या कारणावरुन महिलेला बेदम मारहाण, पुण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल, नेमकं घडलं काय?

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. दररोजन अनेक घटना समोर येत असतात, सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन लहान मुलांवर सोन्याची अंगठी चोरल्याचा आळ घेतल्याचा जाब विचारणा करण्यासाठी गेलेल्या दोन महिलेसोबत वाद घातला.

तसेच एका महिलेला धक्काबुक्की करत अश्लील वर्तन करुन विनयभंग केल्याची घटना विमानतळ परिसरात घडली आहे. ही घटना बुधवारी (ता.१) सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकणी ३८ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गौतम सावंत व त्याच्या पत्नीवर (रा. विमाननगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी यांचा आठ वर्षाचा मुलगा व भावाची १४ वर्षाची मुलगी यांनी सोन्याची अंगठी चोरल्याचा आळ आरोपींनी घेतला.याबाबत फिर्यादी व त्यांची बहिण आरोपींना विचारणा करण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत भांडण करुन दोघींना शिवीगाळ केली. Pune Crime
आरोपी गौतम याने तुम्ही आम्हाला शिकवू नका, तुमच्याच मुलांनी सोन्याची अंगठी चोरील आहे असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांच्या बहिणीला धक्काबुक्की करुन तिच्यासोबत अश्लील वर्तन करत तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मेढे करीत आहेत.