Pune Crime : धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर कोयत्याने हल्ला, नागरिकांनी आरडाओरड केली अन्…


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

तसेच पुण्यात कोयता हल्याच्या घटना वारंवार घडत असल्याते चित्र आहे. पुण्यात एका अल्पवयीन तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटिव्ही व्हिडिओ समोर आला आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत झालेल्या घटनेची पुनरावृत्ती टळली आहे.

याप्रकणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडक पोलिस ठाण्यात महेश सिद्धप्पा भंडारी आणि त्याच्यासोबत असलेल्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणाकडुन अल्पवयीन मुलीवर कोयत्याने हल्ला…

इयत्ता ११वी मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात अडवत कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलगी बोलत नसल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. Pune Crime

मिळालेल्या माहिती नुसार, महेश आणि अल्पवयीन मुलगी हे दोघेही एकमेकांना ओळखतात. दरम्यान मुलगी व तिच्या तीन मैत्रिणी दुपारी सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक ६ येथून जात होत्या. यादरम्यान महेश व त्याचा मित्र येथे आले.

महेशकडे कोयता होता. त्याने झालेल्या वादातून त्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे असलेल्या नागरिकांनी हे पाहताच आरडाओरड केली आणि या तरुणांनी तिथून पळ काढला. याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!