Pune Crime : प्लॉटींगच्या व्यवसायात पावणे दोन कोटींची फसवणूक, १२ जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा..


Pune Crime : प्लॉटींगच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगून विक्री केलेल्या प्लॉटमधून मिळणाऱ्या नफ्यापैकी ५० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून १ कोटी ६५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे.

हा प्रकार सप्टेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०१३ या कालावधीत विश्वविनायक डेव्हलपर्सच्या हांडेवाडी येथील कार्यालयात घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकणी युवराज बाळासाहेब घावटे (वय.३५ रा. गणेश निवास, भवानी पेठ, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उत्तम दामोदर शेवाळे, गौतम शेवाळे, अंकुश शेवाळे, वैभव शेवाळे, सुजाता शेवाळे, गौरत शेवाळे, केतकी शेवाळे,माधुरी शेवाळे यांच्यासह इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपींनी संगनमत करुन त्यांच्या जागेत प्लॉटींग करण्याबाबतचा समजुताची करार दाखवून ६७ प्लॉट पडणार असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. एक प्लॉट १० लाख ७५ हजार रुपयांना विकणार असल्याचे सांगितले.

या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यापैकी ५० टक्के नफा देण्याचे आमिष फिर्यादी यांना दाखवले. आरोपींनी फिर्यादी यांना प्लॉटींगच्या व्यवसायात ४० लाख रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून पैसे गुंतवले. यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना 20 लाख रुपये परत केले.

उर्वरित रकमेवर प्रति गुंठ्याप्रमाणे व व्याज असे मिळून १ कोटी ६४ लाख ७ हजार ५०० रुपये आरोपींनी फिर्यादी यांना न देता आर्थिक फसवणूक केली. तसेच त्यांच्या मालकीची जमीन उल्हास शेवाळे याला परस्पर विक्री केली.

दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरुन हडपसर पोलिसांनी बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!