पुणे महापालिकेची नवीन योजना, आता ‘या’ आजारांवरील औषधे मोफत मिळणार


 

पुणे : सध्या पुणे महापालिकेला राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांर्तगत ४३ लाखांचा निधी मिळाला आहे. यामुळे आता पालिकेच्या सर्व दवाखान्यात उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची मोफत जेनेरिक औषधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.
बदलती जीवनशैली ताणतणाव यातून ३० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढले आहेत.

३० पेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकसंख्येच्या २५ टक्के नागरिकांमध्ये उच्च रक्तदाब, तर १२ टक्के लोकांमध्ये मधुमेह आढळला आहे. त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने प्राथमिक स्तरावर जेनेरिक औषधी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी पुणे महापालिकेला राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांर्तगत ४३ लाखांचा निधी मिळाला आहे. या निधीमध्ये पुणे महापालिका स्वत:चा निधी टाकणार आहे. त्यातून उच्च रक्तदाबाची तीन आणि मधुमेहाची तीन औषधी नागरिकांना मोफत दिली जाणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!