Pune : पोलीस दलात खळबळ! पुणे सीआयडी पोलीस निरीक्षकाचा परळी रेल्वे स्थानकावर आढळला मृतदेह, मृतदेहाचे दोन तुकडे…


Pune : परळी रेल्वे स्थानकानजीकच्या रुळावर शनिवारी सकाळी पुणे येथे सीआयडी विभागामध्ये कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक सुभाष भीमराव दुधाळ (वय ४२) यांचा मृतदेह आढळून आला. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

शनिवारी (ता.९) सकाळी दोन तुकडे झालेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला असून, यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री धुमाळ यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परळी रेल्वे स्टेशन मास्तरांनी शनिवारी सकाळी सात वाजता रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना कळवली होती. ही माहिती मिळताय सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे, पोलीस उपनिरीक्षक साबळे, जमादार बाबासाहेब फड, राजू राठोड, सातपुते व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

परळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाखालील रेल्वे रुळावर एका व्यक्तीचा दोन तुकडे झालेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. Pune

दरम्यान, मयत व्यक्तीचे नाव सुभाष भीमराव दुधाळ असल्याची माहिती रेल्वे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे यांनी दिली. दुधाळ यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याची माहिती मिळालेली नाही. तसेच ते परळी येथे कशासाठी आले होते याचीही मिळालेली नाही. मात्र या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!