Pune : राजकारणातील सर्वात मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करुन अटक करा, नारायण राणेंची खळबळजनक मागणी…

Pune पुणे : राज्यात दंगली होऊ शकतात असे म्हणणारे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, अशी मागणी केंद्रीय लघू सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणतात दंगली होऊ शकतात. खरंच राज्यात अशी परिस्थिती आहे का? असा प्रश्न नारायण राणे यांना विचारण्यात आला. त्यावर राणे म्हणाले, “त्यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे. त्यांना अटक करायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे. दंगलीचा आधार सांगा”.
नारायण राणे यांना पुन्हा त्याबाबतच विचारण्या आलं. त्यावर त्यांनी सावरासावरव केली. आंबेडकर असो किंवा इतर कोणीही, दंगलीविषयी बोलत असेल तर, पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घ्यायला हवी. त्यांची चौकशी करायला हवी. दंगली रोखण्यासाठी कारवाई करायला हवी, असे नारायण राणे म्हणाले. Pune
देशातील चार राज्यातील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सहा डिसेंबरनंतर देशात काहीही घडू शकते. महाराष्ट्रात कधीही दंगली घडू शकतात. त्यामुळे या संदर्भात पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती माझ्याकडे आहे, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (ता. २८) पुण्यात केला.