Pune Airport News : देशभरातून पुण्याला येणारी अनेक विमाने रद्द, प्रवाशांचे हाल; नेमकं कारण काय? जाणून घ्या…

Pune Airport News पुणे : दृश्यमानता खालवल्याने देशभरातून पुण्याला येणारी अनेक विमाने रद्द करण्यात आली आहे. विमाने अचानक रद्द झाल्याने पुण्यातील लोहगाव विमानतळावर प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. अनेक नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
गेल्या अनेक तासांपासून प्रवासी ताटकळत बसले आहेत. दाट धुके आणि खराब हवामानामुळे विमानसेवा रद्द करण्यात आल्याची माहिती विमान प्रशासनाकडून देण्यात आली आहे. विमाने अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमणात गैरसोय झाली आहे. Pune Airport News
मागील दोन दिवसांपासून उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. राजधानी दिल्लीत धुक्यांची चादर पांघरली असून हवेतील दृश्यमानता खालावली आहे. धुक्यांची परिस्थिती पाहता पुण्यासह अनेक ठिकाणी रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. कधी पावसाच्या सरी, तर कधी थंडीचा प्रभाव जाणवत आहे. अशातच दाट धुक्यांमुळे पुण्यासह अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.