पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांचे लाचखोरीचे जाळे मोठे! १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी..


पुणे : भूसंपादनाच्या बदल्यात जादा परतावा देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना सीबीआय न्यायालयाने १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा आदेश दिला.

आठ लाख रुपये लाच घेताना पकडलेला पुण्याचा महसूल अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड याने आणखी काही जणांकडून लाच घेतल्याचा संशय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात ‘सीबीआय’ने व्यक्त केला. तसेच रामोड हा लाचखोर असल्याचे ‘सीबीआय’ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात म्हटले आहे.

सीबीआयने तपासादरम्यान डॉ. रामोड यांच्या घर व कार्यालयातून ६ कोटी ६४ लाखांची रोकड हस्तगत केली आहे. तसेच त्यांच्या कार्यालयात एक सीलबंद आयफोन जप्त करण्यात आला आहे. तक्रारदार व आरोपी यांमध्ये झालेले संभाषण रेकॉर्ड झाले आहे.

त्यामध्ये डॉ. रामोड यांनी पैसे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहे. चौकशीसाठी डॉ. रामोड सहकार्य करत नसून उडवाउडवीची उत्तरे देत आहे.

त्यामुळे गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी डॉ. रामोड यांना पाच दिवस सीबीआय कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अभय अरीकर यांनी केला. सीबीआयचे अतिरिक्त अधिक्षक आय. बी. पेंढारी यांनी डॉ. रामोड यांना न्यायालयात हजर केले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!