Pune Accident : पुणे पोलिसांवर राजकीय दबाव? अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले? जाणून घ्या…

Pune Accident : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण सध्या सर्वसामान्यांसह राजकारण्यांमध्येही चर्चेचा विषय आहे. याचं कारण या प्रकरणात पोलीस दिरंगाई आणि निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

पुणे अपघात प्रकरणी पोलिसांवर कोणताही दबाव नाही, असे स्पष्टीकरण पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. पोलिसांनी कोणाला धमकी दिली असेल तर कारवाई होणार असल्याचेही त्यांनी म्हटले. नातेवाईकांना धमकी दिल्याच्या आरोपांवर पुणे पोलीस आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला फोन करून कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत. पोलिसांवर कोणाताही दबाव नाही, कडक कारवाई व्हावी हीच पोलिसांची भूमिका आहे.

आरोपींनं मद्यप्राशन करून भरधाव वेगात कार चालवली असल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसतंय. आरोपीचा ब्लड रिपोर्ट अद्याप आला नाही, अशीही माहिती त्यांनी दिली. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातप्रकरणी आज खुद्द पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली आहे. अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह पब आणि बारच्या मॅनेजमेंट अशा पाच लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यातील तीन लोकांना अटक केली. त्यांना आज कोर्टात आणण्यात येणार आहे. मुलाच्या वडिलांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना अटक केली जाईल. त्यानंतर उद्या त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.
इतर पुराव्याच्या दृष्टीकोणातून जी गोष्ट गरजेची आहे, त्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहेत. ऑनलाईन पेमेंटची माहिती घेतली जात आहे. किती वाजता झाले, कोणत्या सामुग्रीसाठी झाली आहे. याची माहिती घेतली जात आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, अशी माहिती आयुक्तांनी दिली. Pune Accident
कोणताही निगेटिव्ह रिपोर्ट आलेला नाही. ब्लड पाठवलं आहे. त्याचे रिपोर्ट आलं नाही. दोन ठिकाणी ब्लड सँपल घेण्यात आली आहे. त्याबाबत संभ्रम राहणार नाही. आरोपींनी मद्यप्राशन केलं होतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते दिसत आहे. त्यांनी अल्कोहोलसाठी ऑनलाईन पेमेंट केले होते.
त्याचे बिल आले आहे. आमच्याकडील पुराव्यावरून आरोपींनी अल्कहोल घेतल्याचं स्पष्ट झालं आहे, असंही आयुक्तांनी सांगितलं. या मुलांचे वय 16 वर्षाच्यावर आहे. आणि हा प्रकार हिणस कृतीमध्ये येत आहे.
तसेच या घटनेत दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या मुलांना ॲडल्ट (प्रौढ) म्हणून मानण्यात यावं, अशी विनंती आम्ही कोर्टाला करणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.