Pune Accident : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी…
Pune Accident : पुण्यातील पोर्शे कार अपघातात मोठी माहिती समोर आली आहे. विशाल अग्रवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती, पण न्यायालयाने ती फेटाळली आणि १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
न्यायलयीन कोठडी सुनावल्यामुळे आता विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी जामिनासाठी अर्ज केला जाणार आहे अशी माहिती आरोपीच्या वकिलांनी दिली आहे. Pune Accident
विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवली आणि त्यामुळे दोघांचा जीव गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. आता न्यायालयाने विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील विशाल अग्रवालसोबत सर्वच सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता विशाल अग्रवाल हे उच्च न्यायालयात जाऊ शकतात आणि जामीनासाठी अर्ज करू शकतात.