Pune Accident : अपघातानंतर अल्पवयीन आरोपीची प्रत्यक्षदर्शींना मोठी ऑफर, म्हणाला पाहिजे तेवढे पैसे घ्या पण…! तपासात मोठा खुलासा


Pune Accident : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. बेदरकारपणे आपल्या बापाच्या महागड्या कारनं दोघांना चिरडणारा धनिकपुत्र आणि अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी संपूर्ण प्रशासन कामाला लागल्याचे धक्कादायक वास्तवही या प्रकरणात समोर आले आहे.

याप्रकरणात दररोज नवनवे धक्कादायक खुलासे होत असतात. या सगळ्यात आता घटनास्थळी उपस्थित असलेले प्रत्यक्षदर्शीही पुढे येऊ लागले आहेत. आत्तापर्यंत या प्रकरणातील दोन प्रत्यक्षदर्शींनी संपूर्ण घटनाक्रम सांगितलं आहे.

अपघात घडला त्यावेळी घटनास्थळापासून १० फूट अंतरावर असलेल्या अमीन शेख यांनी सांगितले की, दुचाकीला कारने धडक दिल्यानंतर अल्पवयीन मुलाने जोरात ओरडायला सुरू केले. तो म्हणायला लागला की, तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे घ्या पण, मला मारू नका, तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे मी देईन. Pune Accident

अपघातस्थळावरील जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी अमीन शेखही दिसत आहे. फुटेजमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतंय की, ते रस्ता ओलांडत होते आणि काही क्षणातच एक पोर्शे कार त्याच्या मागून गेली.

त्यानंतर अनिशच्या दुचाकीला धडकली. या धडकेने इंजिनिअर तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या जमावानं कारमध्ये उपस्थित असलेल्या मुलाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

आणखी एका प्रत्यक्षदर्शीनं माध्यमांना अपघताचा आँखो देखा हाल सांगितला. प्रत्यक्षदर्शीनं सांगितले की, अल्पवयीन आरोपीच गाडी चालवत होता. त्यानं सांगितलं की, अपघातावेळी पोर्शे कार भरधाव वेगात आली आणि तिनं दुचाकीला धडक दिली.

कोणालाही काही कळण्यापूर्वीच अगदी क्षणार्धातच धनिकपुत्राने दोघांना आपल्या महागड्या पोर्शेने चिरडले होते. यातील तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. माझ्यासमोरच मुलगी तब्बल १५ फुटांपर्यंत उडाली आणि खाली आदळली. तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, आरोपीला घटनास्थळावरुन पळून जाण्याची संधीच मिळाली नाही.

कारण कारचे सर्वच एअरबॅग्स ओपन झाले होते. कारमध्ये अल्पवयीन मुलाव्यतिरिक्त इतर दोने ते तीन व्यक्ती होत्या. एअरबॅग्स ओपन झाल्यामुळे गाडीतील सर्वचजम बाहेर आले होते. त्यानंतर तिथे असलेल्या जमावाने आरोपीला धरले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मी आरोपीला पकडून ठेवलेले आणि जसे पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मी त्याला पोलिसांकडे सोपवले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!