Pune Accident : एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला, प्रियकराने रागाच्या भरात कार अंगावर घातली, अन्…! पिंपरी- चिंचवडमध्ये भयंकर घटना..


Pune Accident : सध्या पुण्यात अपघाताच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील पोर्शे कारचं प्रकरण ताजं असतानाच आता पिंपरी- चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला चार चाकी गाडीने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे.

या घटनेमध्ये निलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुशील भास्कर काळे या आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास टेल्को रोड यशवंत नगर या ठिकाणी घडलेली आहे. निलेश शिंदे आणि सुशील काळे याची गर्लफ्रेंड एकच आहे. Pune Accident

सध्या त्या युवतीचे सुशील काळे सोबत प्रेमसंबंध असून ती निलेश पासून दूर झालेली आहे. निलेश या तिला त्रास देत होत असत त्या प्रेयसीच म्हणणं आहे. रात्री उशिरा एक्स बॉय फ्रेंड निलेश हा युवतीला भेटायला आला होता.

याबाबतची माहिती तरुणीने सुशीलला दिली. निलेश जेव्हा भेटायला आला तो युवतीशी बोलत होता त्यावेळी सुशीलने चारचाकी गाडीने निलेशला उडवलं. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!