Pune Accident : ब्रेकिंग! पुणे हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर….
Pune Accident : पुणे हिट अँड रन प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला आज अखेर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई हायकोर्टाकडून अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाला आहे.
जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असून बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. मुलाची आत्या पूजा जैननं हेबियस कॉर्पसअंतर्गत दाखल केलेली याचिका हायकोर्टानं स्वीकारली आहे.
मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश जारी केली आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे.
या निकालात अल्पवयीन आरोपीला मोठा दिलासा मिळाल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे कल्याणीनगर अपघात घटनेत बाईकवर असलेल्या तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता.या दोघांच्या आई-वडिलांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. Pune Accident
या भेटत मुख्यमंत्र्यांनी संबंधित घटनेचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्यानंतर आज हायकोर्टाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे या तरुणाची बालसुधार गृहातून सुटका होणार आहे.