सोरतापवाडी येथील प्रगतशील बागायतदार पमन गुंजाळ यांचे निधन
उरुळीकांचन : सोरतापवाडी (ता.हवेली ) येथील प्रगतशील बागायतदार पमन बाबुराव गुंजाळ (वय -८३) यांचे शनिवार (दि.२०) रोजी वृद्धपकाळाने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. सोरतापवाडी येथील हाडाचे शेतकरी म्हणून त्यांचा परिचय होता.
शेतीच्या बळावर उद्योग व्यवसायात भरारी घेणारे कुटूंब म्हणून त्यांचा परिचय आहे. सोरतापवाडी येथील अग्रगण्य उद्योजक राजेंद्र गुंजाळ यांचे ते वडील होते.
Views:
[jp_post_view]