मॅचच्यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषण! निलेश राणेंनी हिसकाच दाखवला, मालवणात ‘त्या’ ठिकाणी थेट बुलडोझरच फिरवला…

मालवण : रविवारी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. असे असताना कोकणातून एक धक्कादायक प्रकार समोर आला. या सामन्यावेळी कोकणात मालवण येथे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर एका मुस्लिम व्यक्तीने भारताविरोधात घोषणाबाजी केली होती.
त्यानंतर वातावरण तापलं. कुडाळचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी त्या व्यक्ती विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. प्रकरण वाढल्यानंतर मालवण नगर परिषद प्रशासनाने आरोपी व्यवसायिकाच्या भंगाराच्या दुकानावर बुलडोझर चालवला. त्याचे दुकान पाडण्यात आले. याचे फोटो आणि विडिओ व्हायरल झाले आहेत.
याबाबत माहिती अशी की, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरु असताना रोहित शर्माच्या विकेटनंतर दुकान मालकाने कथितरित्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. या दुकान मालकावर झालेल्या कारवाईचा व्हिडिओ शिवसेना नेते निलेश राणे यांनी एक्सवर शेअर केला आहे. मालवणात एक मुसलमान परप्रांतीय भंगार व्यवसायिकाने काल भारत पाकिस्तान मॅच नंतर भारत विरोधी घोषणा दिल्या.
कारवाई म्हणून आम्ही या परप्रांतीय हरामखोराला जिल्ह्यातून हाकलून देणारच पण त्या अगोदर तात्काळ त्याचा भंगार व्यवसाय उध्वस्त करून टाकला. मालवण नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी ताबडतोब कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे. यामुळे वातावरण तापले आहे.
दरम्यान, भारत-पाकिस्तान सामन्या दरम्यान सिंधुदुर्गात मालवण येथे दोन लोकांनी भारतविरोधी घोषणा दिल्या. स्थानिकांनी याला विरोध केल्यानंतर वाद सुरु झाला. विषय पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला. त्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सोमवारी सकाळी स्थानिकांनी वास्तव्य करणाऱ्या अवैध बांग्लादेशींविरोधात रॅली काढत कारवाईची मागणी केली. यामुळे आता कारवाई करण्यात आली आहे.