Priyanka Gandhi : ठरलं! महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी मैदानात, पुण्यात होणार ‘या’ दिवशी मोठी सभा…

Priyanka Gandhi : राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांच्या प्रचारसभा होताना दिसत आहे. या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत.
मोदींच्या सभेनंतर काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधी या देखील पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते पुणे दौरा करण्याची शक्यता आहे.
प्रियांका गांधी लवकरच पुणे दौरा करणार….
प्रियांका गांधी लवकरच पुणे दौरा करणार आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रियांका गांधी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर काहीच दिवसांत काँग्रेसकडून पुण्यात रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ प्रियांका गांधी यांचा दौरा असणार आहे. काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधी यांच्यासह सचिन पायलट हे देखील त्यांच्यासोबत सभेला उपस्थित राहणार आहेत. Priyanka Gandhi
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. ४ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींची पुण्यामध्ये भव्य सभा होणार आहे.
पीएम मोदींच्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. अशामध्ये आज काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधी या देखील पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे.