समृद्धी महामार्गावर खासगी बसला अपघात! प्रत्यक्षदर्शीने सांगितला ‘तो’ थरारक अनुभव…


मुंबई : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात काल रात्री झालेल्या भीषण अपघातात बसला आग लागल्याने २६ प्रवासी जिवंत जळून खाक झाले. तर, चालक, क्लिनरसह आठ जण बसच्या खिडकीच्या काचा फोडून बाहेर पडण्यात यशस्वी झाले आहेत.

अपघाताबद्दल प्रत्यक्षदर्शीने थरारक प्रसंग सांगितला आहे. नागपूर-पुणे दरम्यान समृद्धी द्रुतगती मार्गावर पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघातातून बचावलेल्या व्यक्तीने सांगितले की, आम्ही अपघाताच्या ठिकाणी पोहचल्यानंतर पाहिलं, तर भयंकर परिस्थिती होती. आमच्या डोळ्याने लोक होरपळताना पाहत होतो. गाडीने मोठा पेट घेतला होता. गाडीचे दोन टायर बाजूला पडले होते.

अपघात झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले की, कोणीतरी थांबेल आणि मदत करेल. मात्र, भावनाशून्य लोक या जगात आहेत. त्यातील कोणीही याठिकाणी थांबले नाहीत.

बसमध्ये एक महिला आणि लहान मुलगा होता. अपघातानंतर त्यांना बसच्या मागील बाजूने बाहेर काढण्यात आले. पण, ते लहान मुल पूर्ण होरपळलेलं पाहून अंगावर शहारे आले. काच फोडण्यासाठी काही मिळालं असते, तर ते लोक वाचले असते. असे सांगितले.

दरम्यान, या अपघातात सहा ते आठ जण जखमी झाले. अपघाताचे नेमके कारण सध्या तरी समजू शकलेले नाही. जखमींना बुलढाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बसच्या चालकाने सांगितले की टायर फुटल्याने बस उलटून नंतर आग लागली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!