अष्टापूर सोसायटीवर प्रकाश जगताप यांचा एकतर्फी विजय! विरोधकांना १३ विरुद्ध ० नेचारली धूळ…


उरुळीकांचन : संपूर्ण हवेली तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या अष्टापूर विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे हवेली तालुक्याचे ज्येष्ठ नेते व पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश जगताप व त्यांचे बंधू यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने १३ विरुद्ध ० अशी एकतर्फी बाजी मारीत विरोधकांना चितपट केले आहे. अतिशय चुरशीने लढविलेल्या या निवडणुकीत विरोधकांनामोठ्या फरकाने पराभव स्विकारावा लागल्याने हवेली तालुक्यातील सहकार क्षेत्रातील आपली पकड अधोरेखित ठेवली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे, यशवंत सहकारी साखर कारखाना, थेऊर या संस्थांच्या निवडणुकीप्रमाणे बाजार समितीचे माजी सभापती व संचालक प्रकाश जगताप व यशवंत कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांना स्वतः च्या गावातील सहकारी सेवा संस्था असलेल्या अष्टापूर (ता.हवेली ) येथील अष्टापूर सहकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत आव्हान देण्याचा प्रयत्न ‘यशवंत’ चे विद्यमान संचालक शामराव कोतवाल, कारखान्याचे माजी संचालक श्रीहरी कोतवाल यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुकीला हवेलीत विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. मतदानाअखेर मात्र विरोधकांचा सपशेल पराभव झाला आहे

मतमोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन चव्हाण यांनी जाहीर केलेल्या निकालात पॅनेलच्या सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजय झाले आहेत. दरम्यान विजयानंतर या सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हित जोपासण्याचे प्रयत्न करण्यात येईल,संस्थेमार्फत शेतकऱ्यांच्या निगडीत अन्य सुविधा उपलब्ध करण्यात येऊन,संस्थेची पुढील वाटचाल उत्तम नियोजनात करण्यात येईल असा विश्वास पॅनेल प्रमुख प्रकाश जगताप यांनी व्यक्त केला.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे..

सर्वसाधारण मतदारसंघ :-
लिंबाजी सखाराम जगताप, नितीन अंकुश मेमाणे, अभिमन्यू गणपत कोतवाल, अतुल सुखदेव कोतवाल , दत्तात्रय साहेबराव कोतवाल, केरबा बबन कोतवाल, विनायक अर्जुन कोतवाल, बाळासाहेब साहेबराव कोतवाल.

महिला राखीव मतदारसंघ :-
छाया राजाराम कोतवाल,. तुळसाबाई भाऊसो कोतवाल

इतर मागास प्रवर्गा
सुभाष बारीकराव कोतवाल

अणु जाती /जमाती प्रवर्ग
शंकर दादू पाटोळे

भटक्या जाती /जमाती प्रवर्ग
भगवान शंकर गडदे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!