Prajwal Revanna : सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णाला बंगळुरु विमानतळावर पोहोचताच बेड्या, कर्नाटक पोलिसांची कारवाई…


Prajwal Revanna : सेक्स स्कँडल प्रकरणातील फरार असलेला प्रमुख आरोपी प्रज्ज्वल रेवण्णाला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रज्ज्वल रेवण्णा जर्मनीतून बंगळुरू विमानतळावर पोहोचताच कर्नाटक पोलिसांनी त्याला अटक केली.

यानंतर पोलिसांनी त्याला थेट एसआयटी कार्यालयात नेले, एसआयटीकडून प्राथमिक चौकशी केल्यानंतर आरोपी प्रज्ज्वलला न्यायालयात हजर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीला इंटरपोलनं गुरुवारी प्रज्वल रेवण्णाच्या भारतात येण्यासंदर्भात माहिती दिली होती. यानंतर बंगळुरु पोलिसांनी प्रज्वल रेवण्णाच्या अटकेसाठी पूर्वतयारी करुन ठरली होती. बंगळुरु पोलिसांच्या एसआयटीनं प्रज्वल रेवण्णा भारतात पोहोचताच अटकेची कारवाई केली. आता प्रज्वल रेवण्णा बंगळुरु पोलिसांच्या कोठडीत आहे. Prajwal Revanna

प्रज्ज्वल रेवण्णाचे महिला अत्याचाराचे व्हीडीओ सार्वजनिक झाले होते. यानंतर आरोपीविरोधात गुन्हा नोंद करून कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर आरोपी हसन मतदारसंघाचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा जर्मनीला फरार झाला होता.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण समोर आल्यामुळे देशभर या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी प्रज्ज्वलच्या वडिलांनाही अटक करण्यात आली होती. २७ एप्रिलला फरार झालेला आरोपी ३८ दिवसांनंतर भारतात परतला असता पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!